Status Bar

लक्ष असू द्या..

laksha-asu-dya
लक्ष असू द्या..


भरलाय फार्म उमेदवार झालोया
तुमच्याच साठी सरपंच होतोया
कामाचा आहे 
जरा समजून घ्या...
लक्ष असू द्या...

गावाचा विकास मी करणार बर..
.......ची शपत घेऊन सांगतोय खर..
माणसावर आपल्या  
विश्वास थोडा राहू द्या..
लक्ष असू द्या...

राजकारणाची आवड मला पहेलेपासूनच हाय 
तुमच्या सोबत धोका कधी करणार नाय
हक्काच्या माणसाला आपल्या 
निवडून द्या..
लक्ष असू द्या...

नारळफोडू उद्या पासून प्रचार सुरु करू 
गावच्या विकासाची कास आपण धरू 
दोन दिवस काम तुमचं 
बाजूला थोडं राहू द्या..
लक्ष असू द्या...

कुणाचा प्रचार तुम्ही करायलात भाई 
मनात काय तुमच्या काही कळतचं नाही..
.......समोरच बटन दाबायचंय 
आठवण तुम्हाला राहू द्या..
लक्ष असू द्या...

भेटा भाऊ उद्या आपण पार्टी ठेवली हाय 
सांगा कोणतं ब्रान्ड मागवू लाजायचं नाय
तुमची सेवा करायची संधी 
आम्हालाच मिळु द्या..
लक्ष असू द्या...

सोबत राहून भाऊ आमचा शॉट नका करू 
पाकिट दिले म्हणून कुणाचा हात नका धरू 
विजयी करायचंय आम्हालाच 
हे ध्यानी तुमच्या असू द्या..
लक्ष असू द्या...

विरोधक लय खराब त्याचा डाव मला कळतोय 
भाऊ आपला म्हणून तुला समजून सांगतोय 
साथ तूम्ही दिली तर.. 
पंचायत आपलीच गड्या..
लक्ष असू द्या...


                               - रत्नकांत आनंद सुर्यवंशी

Post a Comment

12 Comments

  1. kavita kshi vatli te sangayla visru naka...

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर आहे

    ReplyDelete
  3. Khupch Mast .....
    jasa ek umedvar sangtoy vat-t

    ReplyDelete
  4. विश्व जीतने का एक सिकन्दर इनमें भी होता है,
    बस रोते नहीं पर एक समन्दर इनमें भी होता है,
    यदि लड़की पापा की परी तो लड़के भी कोहिनूर होते है,

    . जबरदस्त भाव.....

    ReplyDelete
  5. आगदी बरोबर Bhai ❤️..

    लक्ष असू द्या...

    ReplyDelete