Status Bar

Tu avadto re mala-तू आवडतो रे मला..!

Tu avadto re mala,tu awadto re mala,marathi kavita,new marathi kavita,marathi poems,shabdkirti
Tu avadto re mala

कशी सांगू मी तुला 
तू आवडतो रे मला 

तुझं नकळत पाहणं, माझ्या विषयीचं बोलणं,
मनानं झुरणं, हळुवार हसणं
हे सारं कळतं रे मला.. 
कशी सांगू मी तुला 
तू आवडतो रे मला..

रुपाला पाहून माझ्या प्रेमात तू पडला 
का स्वभाव माझा तुला रे आवडला..
बोलक्या प्रेमाची समज तुझ्या 
आहे रे मला..
कशी सांगू मी तुला 
तू आवडतो रे मला..

ओळख होई पर्यंत मित्रच बनून राहू 
तुझं माझं प्रेम सख्या निरखून पाहू 
आभासी राहणं तुझं 
पहावत नाही रे मला..
कशी सांगू मी तुला 
तू आवडतो रे मला..

प्रेमाचं अबोल आता सोडणार आहे 
मनातलं सर्वकाही तुला सांगणार आहे 
ऐकायला तू आतुर 
हे माहित रे मला..
कशी सांगू मी तुला 
तू आवडतो रे मला..
       
                        © रत्नकांत सुर्यवंशी

Post a Comment

1 Comments