Status Bar

Mi avadto ka tula-मी आवडतो का तुला...!

Mi avadto ka tula,love poem,letest love poem,marathi love poem,marathi kavita,shabdkirti
Mi avadto ka tula

वेळ काढून कधी सांग न मला 
मी आवडतो का तुला...

तुला पाहावं वाटतं, बघत राहावं वाटतं
तुझ्या जवळ येऊन काही बोलावं वाटतं 
कुणाकडून बोलायचा तू घेशील का सल्ला... 

वेळ काढून कधी सांग न मला 
मी आवडतो का तुला...

खेळातल्या बाहुलीहून दिसतेस तू छान 
तुला पाहिलं कि माझं हरपतं भान 
अशी प्रेमाची दशा कशी सांगू मी तुला...

वेळ काढून कधी सांग न मला 
मी आवडतो का तुला...

ओळख नसताना नकळत तू दिसलीस 
तेव्हा पासून वाटते तू माझीच झालीस 
एकटा बसलो कि तुझा आभास होतो गं मला...

वेळ काढून कधी सांग न मला 
मी आवडतो का तुला...

कधी कधी तुझ्या अबोलाचा येतो मला राग 
प्रेमापोटी स्वप्नांचा माझ्या करतोय मी त्याग 
अशा माझ्या पक्या प्रेमाचं वचन देतोय मी तुला...

वेळ काढून कधी सांग न मला 
मी आवडतो का तुला...

                                      - रत्नकांत सूर्यवंशी




Post a Comment

1 Comments