Status Bar

Premgandh-प्रेमगंध..

premgandh,marathi kavita,new marathi poems,latest marathi poems,marathi poems,shabdkirti
Premgandh


पाहून तुझं रूप सखे 
प्रेमात तुझ्या गं पडलो..
विचार माझ्या भविष्याचा 
करायचाच विसरलो..

प्रेमात तुझ्या मी गं सखे 
हवं नाही ते केलो..
व्हायच्या भेटीगाठी मित्रांशी माझ्या 
नादात तुझ्याच हरवलो..

बेल मोबाईलची वाजताच सखे 
धावत मी गं सुटतो..
आवाज तुझ्या ऐकण्यासाठी 
नेहमीच आतुर असतो..

आठवणींना तुझ्या मनात साठवून 
स्वतःशीच मी गं बोलतो..
दुरावा आलेलं प्रेम आपलं 
सावरायला मी गं पाहतो..

नातं तुझं नी माझं सखे 
सुगंधी चाफ्यासारखं बहरू दे..
हळद तुला नी मला सखे 
एकाच मांडवात लागू दे..
            
                           - रत्नकांत सूर्यवंशी


Post a Comment

3 Comments