Status Bar

Corona kahibe karaylay be-कोरोना काहीबी करायलाय बे..

Corona kahibi karaylay be,Marathi kavita,marathi poems,charolya,charoli,shabd kirti,new marathi kavita
Corona kahibi karaylay be


उशीरा झोपायलो, उशीरा उठायलो 
सोफ्यावर बसायलो, गादीवर लोळायलो 
घरी राहून लय कंटाळा आलाय बे..
कोरोना काहीबी करायलाय बे 

कोणीबी यायलंय, काहीबी बोलायलंय 
कशे बी व्हिडिओ बनवून व्हायरल व्हायलंय..
टीव्ही पाहून तर डोकंच दुखायलंय..
बोलणं ऐकून घरच्यांच लय वैताग आलाय बे..
कोरोना काहीबी करायलाय बे..

फोन लावला कुणाला 
ते झोपूनचं राहायलंय 
उचलला फोन तर कोरोनाचच बोलायलय..
रोज वाढायलेले पेशंट पाहून तर रडूचं यायलंय बे..
कोरोना काहीबी करायलाय बे..

दुकानावर गेलं तर लाकडं लावायलेत 
किराणा माल तर पाच फुटावरूनच द्यायलेत 
उखंड्यावर लोळणाऱ्या पेदाड्यांमुळंच..
देशाची अर्थव्यवस्था चालायली म्हणं बे..
कोरोना काहीबी करायलाय बे..

घरी राहून ढेरी सुटायली
बाहेर जावं तर......लाल व्हायली..!
पोलिसांनी मारलं तरी..
तोटा मटरेल काही.. सुटना चालाय बे..
कोरोना काहीबी करायलाय बे..

मित्रांना जाऊन भेटावं वाटायलंय
गाडीहून एकडं-तिकडं फिरावं वाटायलंय 
पण...लॉकडाऊन काही वाढायचा थांबणा चाल्लायं बे..
कोरोना काहीबी करायलाय बे..

कधी संपते की हे सारं 
पुन्हा पहीले सारखं 
मोकळं फिरावं वाटायलंय बे..
कोरोना काहीबी करायलाय बे..

                                       - रत्नकांत सूर्यवंशी 



  Marathi Kavita | Marathi kavita on love | मराठी प्रेमकविता





Marathi Charolya Shayari | मराठी चारोळ्या



Post a Comment

6 Comments