Status Bar

Olakh-ओळख.. (तिची आणि त्याची)

olakh,love stories,love story,marathi love story,latest marathi love stories,shabdkirti
Olakh


                   आठवत नाही तो कोणता दिवस होता. वाटलं नव्हतं त्या दिवशी असं काही घडेल जे
सदैव स्मरणात राहील.
   
   कॉलेजला जायला निघालो होतो. ऑटोची वाट पाहत थांबलेला असताना नकळत बाजूच्या स्वीट मार्ट मध्ये लावलेल्या घड्याळाकडे लक्ष गेलं सकाळचे नऊ वाजले होते. हिवाळ्याचे दिवस चालू होते त्यामुळे हवेत गारवा होता. थंडगार हवा मन वेधून घेत होती. तेवढ्यात काही लहान मुलं रस्तावरुन सैरावैरा धावताना दिसले. जवळच एखादं ट्युशन क्लासेस असावं बहुतेक. (शहर नवीन होतं माझ्यासाठी दहावी पास होऊन नुकतंच कॉलेजात ऍडमिशन घेतलेलं.) धावता धावता एक मुलगा जोरात खाली पडला. त्या ठिकाणी वाहनांची तेवढी वर्दळ नव्हती हे त्याचे नशीबच...त्याला काही लागले तर नाही हे पाहण्यासाठी तेथे गेलो तेवढ्यात एका कर्कश आवाजासोबत एक गोडं आवाज कानांवर पडला.
 
   कर्कश आवाज....हो तो आवाज जवळच्याच भाजी विक्रेत्याचा होता. तो आपला भाजीपाला विकण्यासाठी जोरजोरात ओरडत होता.
            भाजी घ्या....भाजी....
              मेथीची भाजी...
          दहा रुपयांला दोन जुड्या...
                दहा रुपयांना दोन.!
पण हा आवाज माझ्या साठी एखाद्या चित्रपटाच्या Background Music सारखाच वाटत होता. कारण मला तो गोडं आवाज स्वतःकडं वेधून घेत होता.
 
    यात त्या लहान मुलाविषयी सांगायचं विसरलोच तो मुलगा जोरजोरात रडत होता फार लागले तर नव्हते पण रडत होता. त्याच्या त्या रडण्याकडे पण क्षणभर लक्ष नाही गेलं माझं..! बाजूला त्याचे सोबती होते त्याला घरी घेऊन जातो असं म्हणून ते त्याला घेऊन निघून गेले. तेथे झालेली गर्दी कमी झाली.
 
     तो आवाज पुन्हा पुन्हा कानांवर पडत होता. एक मुलगी भाजी घेत असताना त्या भाजी वाल्याशी भाव करत होती. आवाज स्पष्ट येत होता कारण मी जिथे उभा होता त्यापासून जवळच तो भाजीवाला आपला ठेला लावून बसला होता. तिने जवळपास १५ मी. वेळ घेऊन शेवटी भाव करून दहा रुपयांचा दोन... च्या जागी तीन मेथीच्या जुड्या घेतल्याचं...! नंतर उरलेले पैसे परत घेताना तिच्या हातात असलेले काही Coins खाली पडले. ते उचलून घेत असताना एक Coin माझ्या साईडला आला मी तो उचलून द्यायच्या आधीच तिने पटकन उचलून घेतला आणि पाहतो तर काय ती माझी सातवीला असतानाची Classmate मिनाक्षी होती. (आम्ही तिला सातवीला असताना... मी..नास्की  मी..नास्की म्हणून चिडवायचो. ती खूप चिडायची. ती रागात असताना अधिक सुंदर दिसायची. तिचा राग नेहमी नाकावरच असायचा.) तिने पण मला पाहता क्षणीच ओळखले. 
   
     पिवळ्या कलरचा ड्रेस, मोकळे सोडलेले केस, साधारण मेकअप, थोडा रागट चेहरा त्यावर मला पाहून आलेले हलकीशी Smile वेडं लावून टाकणारी होती. कारण ती सातवीला असताना साधी भोळीच राहायची आता थोडा बदल दिसत होता. म्हणजे Directly सांगायचं झालं तर....आधीच्या पेक्षा दुपटीनं सुंदर ती आज दिसत होती.
     
       तिला चाय, कॉफी साठी विचारलं तिनं नंतर कधी घेऊ असं नकारात्मक मान डोलावून म्हटलं. मला पण कॉलेजला जायला उशीर झाला होता. ती Bye नंतर भेटू म्हनुन निघून गेली. ती कुठे राहते ? आता काय करत आहे ? हे सुद्धा घाईघाईनं विचारायचं राहिलंच.

दोन आठवड्या नंतर...
       तिची (मिनाक्षीची) आणि माझी Common Friend भेटली. तिला पण मी खूप दिवसांनी भेटत होतो. आम्ही सगळे सातवीपर्यंत एकाच शाळेत होतो. त्या शाळेत पुढचा वर्ग नव्हता म्हणून सगळे अलग झालो आणि अलग अलग ठिकाणी गेलो. त्या दिवशी तिच्या सोबत खूप गप्पा केल्या...त्यातच बोलता बोलता तिने मिनाक्षीच नाव घेतलं मग मी तिला दोन आठवड्या पूर्वी भेटलो होतो ते सर्व सांगितलं. मग तिने असं काही
सांगितलं जे मी या कथेच्या सुरुवातीला म्हणालो सदैव स्मरणात राहील.
       असं तिने काय सांगितलं....



* तिने असं काय सांगितलं हे आपण या कथेच्या
   पुढच्या भागात पाहू.

* तुम्हांला पडलेले प्रश्न Comment करा. आणि हि
   कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका...

* खाली Comment Box मधे आपल्या प्रतिक्रिया कळवा..

* आपण वेळ काढून हि कथा वाचल्या बद्दल
   खूप खूप धन्यवाद...!

Post a Comment

4 Comments