अचानक नकळत येणे तुझे
जग ओसाड करण्या जसे
सर्दी,खोकला,खवखवणारा घसा
क्षणात भीती घालतो कसा
पहा न सारे जग त्रासले
तुझ्या येण्याने सारे संक्रमीत झाले
बस न आता तुझं हे बळी घेणं
भरल्या संसाराला एकटं करणं
तुझ्या जाण्याची सगळे वाट पाहताहेत
तुझ्या परतीची तयारी सावध राहून करताहेत
तू गेल्यानंतर सारे जग सुखी होईल
पुन्हा कधी तू येणार नाही याची खबरदारी घेईल ...
- रत्नकांत सुर्यवंशी
0 Comments