![]() |
Kashi deu mi pariksha |
अभ्यास नाही झाला,
काही आठवेना मला,
कधी क्लास नाही केला,
ना कोणता धडाही वाचिला,
अशा वागण्याची रोज मला व्हायला लागली शिक्षा..
सांगा, कशी देऊ मी परीक्षा..
वाचायला बसलो की,
लागतात आमचे डोळे,
वर्षभर फिरलो होतो ते सर्व आठवतात सोहळे,
परीक्षेत दाखवेल कोणी आता हीच उरली आशा..
सांगा, कशी देऊ मी परीक्षा...
सगळेकडे बघत होतो,
सगळे वाचत बसले होते,
तेव्हा आमचे फक्त वेडे चाळे चालले होते,
अभ्यास न करता पास होणे आता हीच आमची इच्छा.. सांगा, कशी देऊ मी परीक्षा...
परीक्षा जवळ आल्या
म्हणून सगळे दक्ष होते,
आमचे लक्ष फक्त मुली पाहण्यात होते,
पास नाही झालो तर उडेल आमचा हशा..
सांगा, कशी देऊ मी परीक्षा..!
आला निकालाचा दिवस,
सगळे टेन्शनमधी होते,
आमचे सारे ध्यान बहाणे बनवण्यात होते
नापास झाल्यावर सगळे काढतील आमची लज्या
सांगा, कशी देऊ मी परीक्षा..!
- रत्नकांत सुर्यवंशी
1 Comments
Yrr kiti chan kavita banvatos ...👌😍
ReplyDelete- Ojas Rock